ठळक बातम्याब्रेकिंग न्यूज

BREAKING NEWS : दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हा छापा टाकल्यानंतर कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले असून, 50 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या छाप्यामध्ये सहभागी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीबीसी वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला होता. आणि त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. नक्की काय प्रकरण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…