मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचा काशिमिरा भागात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दीपक सावंत हे जखमी झाले असून गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचा आज सकाळी पालघर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू संदर्भात अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी जात असताना अपघात झाला. एका डम्परने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिल्याने कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तर सावंत यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असल्याचे समजते.