बोरिवलीमध्ये इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग

594 29

मुंबई- बोरिवली भागात असलेल्या चिकूवाडीमध्ये एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावर मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास ही आग लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची माहिती आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!