#Blinkit App : ऑनलाइन मागवलेल्या ब्रेड पॅकेटमध्ये निघाला जिवंत उंदीर; फोटो व्हायरल

1698 0

आज-काल वेगवान जीवनशैलीमुळे अनेक जण घरपोच ऑनलाईन सुविधा घेण्याकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळेच अनेक ॲप देखील विकसित झाले आहेत. असेच एक ॲप आहे ब्लिंकइट… या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरपोच ग्रॉसरी मागवू शकता. तर झालं असं की या ॲपच्या माध्यमातून एका ग्राहकांन ब्रेडचा पाकीट मागवलं होतं. आता खरंतर ब्रेड एक्सपायरी झालेला येणं हे एक वेळेस आपण मान्य करू शकतो.

पण या पॅकेटमध्ये थेट जिवंत उंदीरच सापडून आला. खरं तर हे पॅकेट उघडण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्या प्लास्टिक मधून तो उंदीर अगदी स्पष्ट दिसून येतोय. असं असतानाही ग्राहकांना अशी असुविधा दिली जाते. ही घटना घडली आहे नितीन आरोडा या व्यक्तीसोबत… या व्यक्तीने ट्विटरवर या ब्रेडच्या पॅकेटचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यानंतर सोशल मीडियामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.

Share This News
error: Content is protected !!