महाराष्ट : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु वाढती उष्णता पाहता पुढील काही दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात येते आहे. विदर्भात पावसानं एकीकडे धुमाकूळ घातला असताना मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस जोरदार सक्रिय होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितल आहे.