chandrakant patil

पुण्यात भाजपचं ‘राष्ट्रवादी पुन्हा…! पुण्यात चंद्रकांतदादांच्या कार्यक्रमात वाजलं अजितदादांच्या पक्षाचं गाणं ! डीजेचालक ताब्यात… पाहा

343 0

पुणे : पुण्याचे पालकमंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं गाणं वाजल्याचं सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का ? नाही ना ? पण विश्वास बसणार नाही असा हा प्रकार चक्क पुण्यात घडलाय. सुरुवातीला ते गाणं ऐकू आणि मग कुठं आणि कसं वाजलं ते पाहूयात…

दिवाळीनिमित्त पुण्यातील रास्ता पेठेतील एका कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. चंद्रकांत पाटील यांची एन्ट्री होताच राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत असलेले ‘राष्ट्रवादी पुन्हा… हे गाणं वाजलं आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. या कार्यक्रमादरम्यान नक्की काय घडलं जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांच्याकडून… संकेत नेमकं काय झालं ? चंद्रकांतदादांच्या कार्यक्रमात अजितदादांच्या पक्षाचं गाणं
वाजलं हा नेमका काय प्रकार आहे ?

दरम्यान, कार्यक्रमात विनापरवाना साउंड सिस्टीम उभारल्याप्रकरणी डीजे चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत असलं तरी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचारगीत वाजलंच कसं यावरून मात्र पुण्यात एकच चर्चा सुरू झालीये.

Share This News
error: Content is protected !!