कधीकाळी भाजपच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक असणारे हार्दिक पटेल यांना भाजपानं वीरमगाम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हार्दिक पटेल चर्चेत आलेत पाटीदार आंदोलन ते आता भाजपाचे उमेदवार नेमका कसा आहे हार्दिक पटेल यांचा राजकीय प्रवास पाहुयात आजच्या TOP NEWS INFO मध्ये
2015 मध्ये गुजरातमध्ये शासकीय नोकरी आणि शिक्षणात पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाचा मुख्य चेहरा हार्दिक पटेल होते. संपूर्ण गुजरातमध्ये हे आंदोलन पेटले होते. या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेलकडे असल्याने अनेकांच्या नजरा 28 वर्षीय हार्दिककडे वळल्या होत्या. या आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचारही उफाळून आला होता. एका आंदोलनातील हिंसाचारा दरम्यान एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले होते.
त्यानंतर हार्दिक पटेलविरोधात आयपीसी 124(ए), 121(ए) आणि 120 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर 2016 पासून हार्दिक पटेल जामीनावर आहेत. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी 2017 मध्ये पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेलशिवाय अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांच्या मदतीने काँग्रेस पूर्ण उत्साहात मैदानात उतरली होती.
पुढे 2019 मध्ये 2019 मध्ये अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेलनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होती. त्यानंतर जुलै 2020 मध्ये, काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हार्दिक पटेल यांची गुजरातचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मात्र नंतर हार्दिक पटेल हे काँग्रेसच्या नेतृत्वावर विशेषतः राहुल गांधी यांच्यावर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यातूनच त्यांनी 2 जून 2022 रोजी भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर आता त्यांना वीरगमान या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपामध्ये प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत नरेंद्र मोदींचा एक छोटा शिपाई म्हणून मी भाजपामध्ये काम करत राहील असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं. आता हार्दिक पटेल हे या मतदारसंघातून विजयी होतात का हेच पाहणं महत्त्वाचं असेल.