पुण्यात गुजरात विजयानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष !

281 0

पुणे : गुजराथ निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विक्रमी विजयाबद्दल भाजपा पुणे शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. गुजराथ विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशक्त नेतृत्वावर जनतेचा विश्वास आणि प्रेमाचे प्रमाण आहे. भाजपाच्या सर्व समावेशक विकासाच्या धोरणावर जनतेनी दाखवलेला विश्वास हेच ह्या यशाचे मुख्य कारण आहे अशा भावना शहराध्यक्ष मुळीक यांनी व्यक्त केल्या आहेत.

भाजपाचा हा विजयरथ आगामी काळात देखील असाच चालू राहील असा विश्वास मुळीक यांनी या वेळी व्यक्त केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी खासदार विनय सहस्रुबुद्धे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदिप लोणकर, बापू मानकर, प्रमोद कोंढरे, पुनीत जोशी, जितेन्द्र पोळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!