ठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूज

#BIG BREAKING : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा सविस्तर

पुणे : येत्या 26 फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा जागेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 

कसबा विधानसभा मतदार संघासाठी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपन उमेदवारी दिली आहे