MUNICIPAL ELECTIONS : प्रभाग रचनेच्या निर्णयावरून पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने… (VIDEO)

285 0

पुणे : 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या निर्णयावरून पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहेत.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेला स्त्री सदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करून 2017 नुसार चार सदस्य प्रभाग पद्धतीनुसारच निवडणुका होणार असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यानंतर भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या निर्णयाचा स्वागत केलं .

तर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं पाहुयात काय म्हणालेत जगदीश मुळीक आणि प्रशांत जगताप…

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का असल्याचं जरी बोलला जात असेल तरी या निर्णयावरून आता आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण तापणार एवढं मात्र नक्की….

Share This News
error: Content is protected !!