#PUNE : भरोसा सेलमध्ये पत्नी पीडित पुरुषांच्या चित्रविचित्र तक्रारी; रोज दोन पुरुषांचे करावे लागते समुपदेशन

598 0

पुणे : आतापर्यंत महिलांच्या पतीविरुद्ध आणि सासरकडचं विरुद्ध अनेक तक्रारी ऐकल्या आणि वाचल्या असतील. परंतु पत्नीपीडित पुरुषांच्या देखील भरोसा सेल कडे येणाऱ्या तक्रारींचा आकडा ऐकून तुम्ही अचंबित व्हाल. पुण्यामध्ये चार वर्षांमध्ये सुमारे 3000 पुरुषांनी भरोसा सेलकडे पत्नी विरुद्ध तक्रारी नोंदवले आहेत. या वादातून अनेक वेळा संसारामध्ये वितृष्ठ आलेले देखील पाहायला मिळते.

यामध्ये पत्नी सतत सोशल मीडियावर व्यग्र असते. असा देखील वाद अनेक वेळा आल्याचं पाहायला मिळते. सध्याच्या काळात घरातील दोन्हीही प्रमुखांनी कमावण्यासाठी बाहेर पडून काम करावे लागते. यातूनच वाद निर्माण होत जातात. पुरुषांचा पूर्वापार चालत आलेला अहंकारी स्वभाव देखील यास कारणीभूत ठरत असल्याचं समोर येत आहे.

तर अनेक वेळा महिला किरकोळ कारणावरून वाद झाला तरी पतीला कायद्याची भीती घातली जाते. घरातली किरकोळ भांडणे जसे टीव्ही उशिरापर्यंत पाहणे मोबाईलवर जास्त वेळ घालवणे मुलांकडे लक्ष द्यायला सांगितले, एखाद्या गोष्टीला विरोध केला किंवा त्यांचे म्हणणे न ऐकले तर थेट कोर्टात जाण्याची धमकी दिली जाते. अशा किरकोळ कारणांमुळे आत्तापर्यंत भरोसा सेलमध्ये रोज दोन पुरुषांचा समुपदेशन करावं लागत आहे. तर चार वर्षांमध्ये आतापर्यंत तीन दिवसांत समुपदेशन करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide