#VIDEO : पुण्यात विचित्र अपघात; सिमेंट काँक्रीटच्या ट्रक खाली सापडून तरुणाचा दुर्दैवी अंत

1497 0

पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुनावळे रस्त्यावरून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या ट्रक खाली सापडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते आहे, समोरून पायी येणाऱ्या एका पादचाऱ्याचा या दुचाकी स्वाराला आधी धक्का बसला. त्यामुळे हा दुचाकीस्वार खाली पडला. पण नेमक त्याच वेळी हा सिमेंट काँक्रीटचा ट्रक मागून येत होता. या ट्रकच्या चाकाखाली आल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हा व्हिडिओ अत्यंत भीषण आहे. रस्ते लहान, त्यात दोन्हीही बाजूनी गाड्या पार्क केलेल्या दिसून येतात. त्यात पादचाऱ्यांन देखील चालण्यासाठी योग्य मार्ग नाहीये. हे देखील दिसून येते. थोड्याशा चुकीने ही व्यक्ती आज जीवाला मुकली आहे.

Share This News
error: Content is protected !!