#ACCIDENT : पिंपरी चिंचवडमध्ये विचित्र अपघात; थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

19025 0

पिंपरी चिंचवड : सकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या 47 वर्षीय व्यक्तीला एका भरदार कारने जोरदार धडक दिली आहे. या धडकेमध्ये ही व्यक्ती अक्षरशः पाच फूट उंच उडवली गेली. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी आहेत.

या अपघातात बळीराम गाढवे वय वर्ष 47 हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सकाळी फिरायला गेले असता पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारण त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की त्यानंतर गाढवे हे अक्षरशः पाच फूट हवेत उडाले असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येते आहे.

घटना घडल्यानंतर कारचालक फरार झाला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!