मोठी बातमी : तुकाराम मुंढे यांची साईबाबा संस्थानच्या सीईओपदी नियुक्ती

573 0

शिर्डी : आपल्या शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःसह आपल्या कामकाजाच्या वर्तुळात काम करणाऱ्या सर्वांनाच शिस्तीचे धडे शिकवणारे बेधडक अधिकारी तुकाराम मुंढे यांचे काल बदलीचे आदेश काढण्यात आले होते. तर यानंतर हे वादळ कुठे सरकते याकडे तर सर्वांचे लक्ष होतेच तर अखेर हे वादळ आता शिर्डीमध्ये दाखल होणार आहे. अर्थात तुकाराम मुंढे यांची साईबाबा संस्थानच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य विभागामध्ये कार्यरत असताना त्यांच्या चोख आणि धडाकेबाज कामगिरीमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची झोप अक्षरशः उडाली होती त्यामुळे तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होते आणि अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले असून भाग्यश्री बानायत यांची सध्या नियुक्ती शिर्डी संस्थांच्या सीईओ पदी नियुक्ती होती त्यांचे बदलीचे आदेश निघाले असून भाग्यश्री बानायत यांना आता विदर्भ सेक्युरिटी डेव्हलपमेंट बोर्ड च्या सेक्रेटरी पदी नियुक्त करण्यात आला आहे

विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या प्रामाणिक आणि बेधडक कामकाजामुळे त्यांच्या सोळा वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये आत्तापर्यंत त्यांची तब्बल 19 वेळा बदली करण्यात आली आहे त्यामुळे अर्थात ही बदली देखील त्यांच्यासाठी नवीन नव्हती पण आता त्यांच्या या नवीन बदलीमुळे साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांची झोप उडणार हे नक्की

Share This News
error: Content is protected !!