मोठी बातमी : राज्य महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस; दोन दिवसात खुलासा करण्याचे आदेश

318 0

पुणे : उर्फी जावेद हीच्या व्हिडिओवरुण चित्रा वाघ या आक्रमक झाल्या होत्या. त्यावर रूपाली चाकणकर यांच्यासह महिला आयोगावर आरोप केला होता. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांचीच अडचण वाढवून दिली आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटिस बजावून दोन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे सांगितलं आहे.

त्यात चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली आहे, महिला आयोगाची गरिमा राखली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide