मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क हवाई हल्ला ? मुंबई पोलीस सतर्क…

813 0

मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी रोजी शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. 26 जानेवारीची ही विशेष परेड मुंबईकरांसाठी आकर्षणाचा विषय असते. मात्र गुप्तचर विभागाने दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, शिवाजी पार्कवर हवाई हल्ला करण्याचा कट रचला असल्याचं समजते आहे. त्यामुळे गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे. हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून परिसरात बारकाईने चौकशी केली जाते आहे.

Share This News
error: Content is protected !!