BIG NEWS : पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा बंद आंदोलनाला हिंसक वळण VIDEO

740 0

पुणे : बेकायदा बाईक टॅक्सीच्या विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षा संघटनांनी आंदोलनात सुरुवात केली आहे दरम्यान पुण्यातील या आंदोलनाला हिंसक रूप आले आहे. पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं यावेळी सिंहगड रोड आणि वडगाव मधील रिक्षा देखील फोडण्यात आल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार या संपामध्ये 12 ते 13 रिक्षा संघटनांचा सहभाग आहे. 

हा बेमुदत बंद आज पुणे आरटीओ कार्यालयासमोर पुकारण्यात आला असून या आंदोलनास हिंसक रूप मिळाले आहे या संघटनांच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन देखील करण्यात येते आहे यावेळी बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले असून राज्यातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांचा कारभार बंद करावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती केशव नाना क्षीरसागर यांनी यावेळी दिली आहे

Share This News
error: Content is protected !!