मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

405 0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शरद पवार यांच्या ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समजते. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

फोन करणाऱ्याने हिंदी भाषेमध्ये धमकी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शरद पवार यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलिस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गामदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!