BIG NEWS : तुर्कीत कोळसा खाणीत स्फोट; 14 कामगारांचा मृत्यू; 49 कामगार अजूनही अडकले खाणीत

274 0

तुर्की : शुक्रवारी तुर्कीमध्ये कोळसा खाणीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत 14 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जखमींवर उपचार सुरू आहेत. म्हणजे या खाणीमध्ये अद्याप देखील अंदाजे 49 कामगार अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटन प्रांतातील आमसारा शहरात ही खाण आहे.

घटनास्थळी बचाव पथके युद्धपातळीवर कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या खाणीमध्ये 110 कामगार कार्यरत होते. या खाणीमध्ये नक्की कशामुळे स्फोट झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र धमाका झाल्यानंतर खाणीमध्ये खोलवर काम करणारे कर्मचारी आत अडकले आहेत.

त्यात आग लागल्यानंतर खाणीचा काही भाग देखील कोसळला. सध्या या कामगारांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!