मोठी बातमी : काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे भारत जोडो पदयात्रे दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

468 0

पंजाब : एक मोठी बातमी समोर येते आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. याविषयी अधिकृत ट्विट पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे. ” काँग्रेस खासदार संतोख सिंह यांच्या अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ” असे ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे.

काही वेळापूर्वीच पदयात्रेमध्ये संतोख सिंह हे सहभागी झाले होते. दरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

संतोख सिंह यांनी 2014 आणि 2019 मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

Share This News
error: Content is protected !!