पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून आजारी होते. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. जगताप यांच्या निधनामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये शोककळा पसरली आहे.
