BIG BREAKING : गोबरगॅसच्या टाकीत पडल्याने बापलेकासह काकांचा अंत, एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला; बारामतीतील धक्कादायक घटना

3586 0

बारामती : माळेगाव पोलीस ठाणे तालुका बारामती हद्दीत बारामती सांगवी रोड, आटोळे वस्ती खांडज गावचे हद्दीत भानुदास आटोळे यांच्या शेतामध्ये ड्रेनेज पाईपलाईनच्या मेन होलमध्ये पान बुडी मोटरने पाणी काढत असताना प्रवीण आटोळे हा बुडाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील भानुदास आटोळे आणि काका प्रकाश आटोळे आणि बाबासाहेब पिराजी गव्हाणेयांचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बारामतीतील माळेगाव पोलीस ठाणे तालुका येथील खांडज गावाटली बाप लेक आणि काका यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. शेतामध्ये ड्रेनेज पाईपलाईनच्या मेन होलमध्ये पान बुडी मोटरने पाणी काढत असताना मोटरला कचरा लागला म्हणून ड्रेनेजमध्ये उतरून साफ करण्यासाठी गेले असता मुलगा प्रवीण भानुदास आटोळे हा बुडाला. त्याला वाचवण्यासाठी वडील भानुदास आटोळे गेले असता ते देखील बेशुद्ध होऊन पाण्यात पडून बुडाले. त्यांना वाचण्यासाठी गेलेले काका प्रकाश सोपान आटोळे आणि बाबासाहेब पिराजी गव्हाणे हे सुद्धा ड्रेनेज होलमध्ये बेशुद्ध होऊन पाण्यात पडून बुडाले आहेत

घटनेची माहिती कळल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने मेनहोलची बाजू उकरून काढून चारही जणांना बाहेर काढून सिल्वर जुबिली हॉस्पिटल बारामती येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच या चौघांचीही दुर्दैवी अंत झाला आहे. एकाच दिवशी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात हालहाल व्यक्त केली जाते आहे.

Share This News
error: Content is protected !!