Big Breaking- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द

1539 0

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या दोन्ही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलेल्या पक्षांची राष्ट्रीय स्तरावरील मतदान टक्केवारी ६ पेक्षा कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीला नव्याने राष्ट्रीय पार्टीचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी ‘आप’ला गुजरात किंवा हिमाचल प्रदेशमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेण्याची गरज होती. गुजरात मध्ये ‘आप’ला १३ टक्के मते मिळाली. या आकडेवारीच्या जोरावर आम आदमी पार्टीची गणना राष्ट्रीय पक्षांमध्ये झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!