पंढरपुरात खासदार धनंजय महाडिक यांना मोठा धक्का; 11 पैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

265 0

पंढरपूर : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतो आहे. आज राज्यातील 7000 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये 11 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता आली असून, भाजपला केवळ चार ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागल आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय.

Share This News
error: Content is protected !!