BIG NEWS : देशात NIA आणि ED ची मोठी कारवाई ; PFI च्या 100 हून अधिक लोकांना अटक

429 0

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यासह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. एनआयए आणि ईडीने या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हास्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेऊन आतापर्यंत १०० जणांना अटक केली आहे.

एनआयएने केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादाला निधी पुरवणे , प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये समाविष्ट होण्यासाठी कट्टर बनवणे अशा कारवायांमध्ये जे व्यक्ती सामील आहेत त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर देखील तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येतो आहे.

तसेच टेरर फंडिंग संदर्भात एनआयए कडून महाराष्ट्रात केलेल्या छापेमारीमध्ये पुण्यातसह नवी मुंबई ,भिवंडीतील २० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पीएफआयचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनआयए कडून टेरर फंडिंग बाबत कसून तपास केला जात आहे. या तपासाला वेग आला असून एनआयए कडून देशभरात मोठी कारवाई केली जाते आहे. या छापेमारीमध्ये 200 हून अधिक अधिकारी तपास करत असल्याचे समजते.

Share This News
error: Content is protected !!