सावधान…’तुका म्हणे’ म्हणू नका ! नववर्षाच्या शुभेच्छा देताना हा शब्द प्रयोग करणं पडू शकतं महागात

306 0

सावधान ! नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’, असं चुकूनही म्हणू नका. कारण यापुढं असं चालणार नाही. आता ‘तुका म्हणे’ असा शद्ब प्रयोग केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

‘तुका म्हणे’, हा शब्द प्रयोग करण्यावर देहू संस्थाननं आक्षेप घेतला आहे. नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्द प्रयोग केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिलाय.

नववर्ष साजरा करत असताना अनेक जण एकमेकांना ‘तुका म्हणे’ असा उल्लेख करून शुभेच्छा देतात. तरुण मुलं अभंगांची मोडतोड करून ग्रीटिंग्ज तयार करतात. तुका म्हणे ही तुकाराम महाराजांची नाम मुद्रा आहे, ती स्वाक्षरी आहे. ज्या वाक्याला आपण ‘तुका म्हणे’ लावतो त्याला प्रमाण असतं. वारकरी संप्रदायात ते आदराचं नाम आहे. त्यामुळं कृपा करून कुणीही नववर्षाच्या शुभेच्छा देताना संत तुकारामच नव्हे तर कुठल्याही संतांच्या नावाचा वापर करून चुकीचं विडंबन करू नये, अशी विनंती नितीन महाराज मोरे यांनी केलीये पण तरीदेखील जर कुणी तुका म्हणे असा शब्द प्रयोग करेल त्या संबंधित व्यक्तीवर देहू संस्थान कडक कारवाई करेल, असा इशारा नितीन महाराज यांनी दिला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!