बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पुण्यातील गंभीर समस्यांचा वाचला पाढा, अधिकाऱ्यांची घेणार बैठक , मुख्यमंत्र्यांचे निर्देश

455 0

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी पुण्यातील अनेक समस्यांबाबत माहिती देऊन शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक घेण्यात यावी अशी विनंती केली.

यामध्ये पुणे शहरातील वाहतूक कोंडी, पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचे सातवे वेतन काढण्याबाबत, तसेच पाणी वाढ, कोंढवा बायपास, सय्यद नगर हांडेवाडी अंडरपास, काळेपडळ येथील पोलीस स्टेशनचे स्वतंत्र कामकाज, निवासी मिळकतींना 40 टक्के कर सवलत पुन्हा सुरू करावी. शहरासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे, ससून प्रमाणेच हडपसरमध्ये आणखी एक हॉस्पिटल उभारण्यात यावे आदी महत्त्वाच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी अशी विनंती भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुण्याचे अधिकारी यांची लवकरात लवकर बैठक घेऊन या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!