ठळक बातम्या

15 ऑगस्टची सुट्टी रद्द ; योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेश : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 15 ऑगस्ट या दिवशी उत्तर प्रदेश मधील सर्व शाळा,महाविद्यालये,सरकारी कार्यालय आणि खाजगी कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेश मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. त्या निमित्तानेच योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टची सुट्टी रद्द करण्यात आली असून, या दिवशी उत्तर प्रदेश मधील शाळा, महाविद्यालय ,बँक सरकारी आणि खाजगी कार्यालयात सुरु राहणार आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत .त्या निमित्ताने देशभरामध्ये विविध कार्यक्रम उत्साहात साजरा केले जातात. परंतु योगी सरकारने 15 ऑगस्टची सुट्टी रद्द करून या दिवशी राज्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे समजते आहे.