पुण्यात वातावरण तापले : वंचित बहुजन आघाडीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने

324 0

पुणे : आज कोथरूडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या विरोधात केलेल्या अपमान जनक वक्तव्यांमुळे पुण्यातील वातावरण तापले आहे.

सातत्याने महापुरुषांबाबत होणाऱ्या आपमानजनक वक्तव्यांमुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उठलेली असतानाच, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड आणि वारजे परिसरामध्ये रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!