सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष अभ्यासक्रम; हरी नरके, भुजबळांचा विरोध

434 0

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री गणेश अथर्वशीर्ष यावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र या अभ्यासक्रमावरून मोठं वादंग निर्माण झालंय.

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार असून हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देखील दिल जाणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती , सावित्रीबाई फुले पुणे, संस्कृत प्राकृत विभाग आणि लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमान हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे मात्र याला लेखक आणि पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी विरोध केला आहे.

बुद्धीची देवता असलेल्या श्री गणरायाच्या अथर्वशीर्ष अभ्यासक्रमावरून हरी नरके, छगन भुजबळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आमने-सामने आल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे.

Share This News
error: Content is protected !!