पुण्यात रात्री बे रात्री टेरेसवर पब आणि डीजेवर गाणे लावून होते आहे नाच-गाणे; बेकायदा पबवर कारवाईसाठी शहर शिवसेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

779 0

पुणे : पुण्यामध्ये अनेक ठिकाणी हॉटेलमध्येमध्ये मद्यविक्री आणि हुक्का सहज मिळतो. शौकिनांसाठी खास मेजवानी असते. पण काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत ओपन टेरेसवर पब आणि हॉटेलमध्ये ऑर्केस्ट्रा, डीजेवर गाणे लावून नाच गाणे चालू असण्याचा प्रकार सर्रास घडतो आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी राहतात असे पुणे शहरातील कॅम्प, कोरेगाव पार्क या भागांमध्ये प्रमाण जास्त आहे.

रात्री उशिरापर्यंत हे पब सुरू असतात. त्यामुळे अनुचित प्रकार होण्याच्या घटना देखील सातत्याने वाढत आहेत. या संदर्भात लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत आणि पुणे शहरातील भरोसा सेलच्या अंतर्गत दामिनी पथक हे सक्रिय नसल्याचे दिसून आल असून या दामिनी पथकाने महाविद्यालय आणि विद्यालयांच्या परिसरात गस्त घालावी, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन आज पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना देण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!