दिल्ली- उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीच्या ट्रेंडपासून आघाडीवर आहे. 403 पैकी 400 जागांचे कल उघड झाले आहेत. या ट्रेंडमध्ये भाजप 300 चा आकडा गाठणार आहे. तर समाजवादी पक्षानेही 100 चा टप्पा गाठला आहे.
पाहुयात पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाबाबत सविस्तर माहिती…
पंजाब-
पंजाबमध्येही असेच काहीसे घडत आहे. एकूण 117 जागांपैकी आम आदमी पक्षाने 90 जागांचा टप्पा ओलांडला आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला सरकार परत करणे कठीण झाले आहे. कारण आतापर्यंत काँग्रेस खूप मागे पडली आहे. सोनू सूदची बहीण मालविकाही पंजाबमध्ये पिछाडीवर आहे.
गोवा-
40 जागांच्या गोवा विधानसभेतही भाजप सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. गोव्यात भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आघाडी 13 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या ट्रेंडमध्येही आम आदमी पक्षाचे खाते उघडलेले नाही.
उत्तराखंड-
उत्तराखंडमध्ये उघड झालेल्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पक्ष पूर्णपणे मागे पडला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही.
मणिपूर-
मणिपूरमधील 60 जागांपैकी भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. भाजप 28 जागांवर आघाडीवर असून राज्यात काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे.
उत्तर प्रदेश-
उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 240 च्या वर जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 111 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे.