पुणे : दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 9:45 वाजता पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. गेल्या सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य मापक केंद्रावर नोंदला गेलेला पाऊस 90 मिलीमीटर एवढा आहे. 11:30 वाजता पावसाचा जोर थोडासा ओसरला. मागील 120 वर्षामध्ये 24 तासात सर्वाधिक पडलेला पाऊस 181.1 मिलीमीटर असून तो 5 ऑक्टोबर 2010 रोजी झाला होता. त्यांनतर 1961 मध्ये 131.9 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. 15 ऑक्टोबर 2020 रोजी 112.1 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. मंगळवारी रात्री केवळ सव्वा तासात (रात्री 9:45 ते 11:00) या कालावधीत 90 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
दिनांक 18:10:2022 पहाटे सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात काल राञी झालेल्या पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे पाणी शिरणे, झाडपडी, सीमाभिंत पडणे अशी वर्दी मिळाली आहेत.
पाणी शिरले
– औंध, स्पायसर चौक
– नगर रोड, सह्याद्री हॉस्पिटल जवळ
– अल्पबचत भवन, सञन्यायालय इमारत
– रास्ता पेठ, शिराळशेठ चौक
– कोंढवा खुर्द, लॅटीट्युड सोसायटी
– महर्षी नगर, कृष्णा चेंबर
– बिबवेवाडी, महेश सोसायटी
झाडपडी
– कोंढवा खुर्द, ब्रम्हा सोसायटी
– हडपसर, मगर दवाखाना
– अल्पबचत भवन, रेसिडंसी जवळ
– जुना मोटार स्टँड
सीमाभिंत पडली
– धानोरी रस्ता, जगराज सोसायटी