Ashish Sakharkar

Ashish Sakharkar Passes Away : मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन; त्याची ‘ती’ शेवटची पोस्ट होतेय व्हायरल

8662 0

मुंबई : मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन (Ashish Sakharkar Passes Away) झाले आहे. आशिषने देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचवले होते. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या कारकिर्दीत पटकावले आहेत.आशिष गेल्या गेल्या काही दिवसांपासून एका आजाराशी झुंज देत होता.अखेर या आजाराशी त्याची सुरु असलेली झुंज अपयशी (Ashish Sakharkar Passes Away) ठरली. या दुर्दैवी घटनेमुळे आशिषच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

OTT Rule : सरकारने OTT साठी बनवले ‘हे’ नियम; शिवीगाळ आणि अश्लीलतेवर येणार बंदी

कशी आहे आशिषची कारकीर्द?
चार वेळा मिस्टर इंडिया विजेता, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आशिष साखरकर म्हणजे, अनेक बॉडीबिल्डर्सचे रोल मॉडल. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात आशिष साखरकर यांना बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील आयकॉन मानलं जात होते. आशिष यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार (Ashish Sakharkar Passes Away) करण्यात येणार आहे.

शेवटची पोस्ट होत व्हायरल
“मिस्टर युनिव्हर्स 2011, माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस, कास्यपदक”, असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले होते. आशिषची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याचे असंख्य चाहते आणि मित्र श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Share This News
error: Content is protected !!