Warkari in pandharpur

Bakri Eid : ‘यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही’, छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय

659 0

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण सध्या भक्तिमय झाले आहे. यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद (Bakri Eid) एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बकरी ईदला (Bakri Eid) दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय संभाजीनगरमधील वाळूज भागातील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. येत्या गुरुवारी 29 जून रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

यंदा आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत आहे. त्यामुळे दोन सणांचा अनोखा संगम एकाच दिवशी पाहायला मिळणार आहे. मात्र बकरी ईदला (Bakri Eid) होत असलेली कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आल्याने सगळीकडे याची चर्चा होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!