व्यसनाधीन पतीने दारूसाठी 100 रुपये मागितले म्हणून पत्नीने थेट रॉडने …

289 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यसनाधीन पतीने पत्नीकडे शंभर रुपये दारू पिण्यासाठी मागितले. त्यानंतर पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. याच्या रागातून दोघांमध्ये जबरदस्त भांडण झाले. या भांडणातून पत्नीने पतीच्या डोक्यात रॉड मारून त्याला गंभीर जखमी केले परंतु या हल्ल्यामध्ये पती ठार झाल्याचे लक्षात येताच तिने घरातून पळ काढला या घटनेची माहिती मृत सुशील कुमार यांच्या भावाने पोलिसांना दिली याप्रकरणी सुशील कुमार यांची पत्नी दीपा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हे दाम्पत्य उत्तर प्रदेश मधील सिक्री या गावांमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते सुशील कुमार हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते. परंतु त्यांना दारूचे व्यसन होते. याच व्यसनातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि यामध्ये सुशील कुमार यांची हत्या झाली आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!