नवी दिल्ली- एक धक्कादायक बातमी म्हणजे लष्कराचे वाहन श्योक नदीमध्ये कोसळून ७ जावं शाहिद झाले आहेत. थोईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला.
याबाबतची माहिती अशी की, परतपूरच्या संक्रमण शिबिरातून २६ जवानांची एक तुकडी उप सेक्टर हनिफाच्या फॉरवर्ड एरियाकडे जात असताना रेतीत ९ वाजण्याच्या सुमारास थोईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर लष्कराचे वाहन घसरून सुमारे ५० ते ६० फूट खोल नदीत कोसळले. आतापर्यंत २६ पैकी ७ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे.
गंभीर जखमी जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. त्याला उपचारासाठी वेस्टर्न कमांडकडे पाठवले जाऊ शकते. लष्कराची बस कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरली आणि नदीत पडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सर्व जखमी जवानांवर परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दुर्घटनेत भारतीय जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. शहीद जवानांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले की, देश त्यांच्या सेवांचे स्मरण कायम ठेवेल. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. शोक आणि जखमी जवान लवकर बरे होवोत. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.