Breaking News

लष्कराच्या लढाऊ विमानाचे रनवे ऐवजी राष्ट्रीय महामार्ग 16 वर लँडिंग, कारण….

331 0

आंध्र प्रदेश : आज लष्कराच्या लढाऊ विमानाचे एन.एच. 16 वर लँडिंग करण्यात आले. हे एक ट्रायल लँडिंग होते. त्यामुळे भविष्यात कोणतीही युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास रनवे ऐवजी लढाऊ विमानांचे महामार्गावर लँडिंग करता येणार आहे. ही चाचणी आज यशस्वीपणे पार पडली आहे.

भारतीय हवाई दलाने गुरुवारी आंध्र प्रदेश येथील बापटला येथे राष्ट्रीय महामार्ग 16 वर नव्याने बांधण्यात आलेल्या 4.1 किलोमीटर इमर्जन्सी लँडिंग सुविधाची चाचणी घेतली आहे. ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली असून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी या चाचणी आणि सरावांमध्ये भाग घेतला होता. या लढाऊ विमानांनी 100 मीटर उंचीवर उड्डाण केले, आणि त्यानंतर महामार्गावर यशस्वीरित्या इमर्जन्सी लँडिंग देखील केलं. आणि त्यानंतर पुन्हा विमानांनी आकाशात उड्डाण केल आहे.

Share This News
error: Content is protected !!