केस गळतीने हैराण झाले आहात ? या घरगुती उपायांनी केवळ आठ दिवसात थांबू शकते केस गळती

307 0

केस गळणे हा आजार नसून केवळ एक समस्या आहे. केस गळतीची अनेक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, ताणतणाव, कोंडा किंवा अति प्रमाणात सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे हे देखील असू शकते. पण जर का केस गळती खूपच जास्त प्रमाणात होत असेल, तर ही काळजी करण्याची नक्कीच गोष्ट आहे.

केस लांबसडक अनेक तरुणींना आवडत असतात. काहींना लहान हेअरकट देखील आवडत असतात. केसांची उंची कशीही असो केस काळेभोर आणि घनदाट असतील तर सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडत असते. त्यासाठीच खास आज आपण पाहूयात, अगदी घरगुती उपायांमधून केस गळती 95% पर्यंत थांबवता येऊ शकते.

१. लसुन : लसुन बारीक ठेचून याला खोबऱ्याच्या तेलामध्ये घालावे. हे मिश्रण गरम करून घ्यावे, कोमट झाल्यानंतर केसांच्या मुळाशी पंधरा मिनिटे गोलाकार मसाज करावा. हे 30 मिनिटे तरी तेल तुम्हाला डोक्यावर तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी हा उपाय करा, तुम्हाला अवश्य परिणाम जाणवेल.

See the source image

२. कांद्याचा रस : एक कांदा बारीक चिरून घेऊन मिक्सर मधून त्याचा रस काढून घ्या. त्यानंतर हे सर्व एका रुमालातून गाळून घेऊन कांद्याचा खाली गाळून आलेला रस तुम्हाला केसांच्या मुळाला लावायचा आहे. अगदी पाच मिनिटे मसाज करा आणि तीस मिनिटांसाठी तरी हा रस तसाच डोक्यावर ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुऊन टाका. आठवड्यातून दोन वेळा कांद्याचा रस लावल्याने त्वरित केस गळती थांबण्यास मदत होईल.

See the source image

३. आवळा पावडर : आवळ्याची पावडर घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस एकत्रित करावा. हे मिश्रण आता केसांच्या मुळांपर्यंत लावायचे आहे. सुकल्यानंतर कोमट पाण्याने हा पॅक धुवून टाका. हा देखील केस गळतीवर उत्तम पर्याय आहे.

See the source image

४. अंडे : अंड्यातील पांढरा भाग बाजूला काढून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करावे. हे मिश्रण चांगले फेटून घेऊन केसांना लावून ठेवा. अर्धा तासांसाठी हा पॅक तसाच ठेवा. आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. केस गळती जर खूप असेल तर हा पर्याय अवश्य वापरून पहा. आठवड्यातून दोन वेळा अंड्याचा असा पॅक केसांवर नक्की लावा.

See the source image

५. या उपायांसह केस धुताना गरम पाण्याचा वापर टाळणे, केस विंचरण्यासाठी मोठ्या दाताचा लाकडी कंगवा वापरणे, तेल लावून घराबाहेर पडणे टाळणे, रात्री झोपताना घट्ट केस बांधून झोपणे आणि केमिकल्सचा वापर कमीत कमी करणे हे देखील लक्षात ठेवा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!