#MPSC च्या विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा; EWS प्रमाणपत्राची अट शिथिल, वाचा सविस्तर बातमी

709 0

MPSC च्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. EWS प्रमाणपत्राची अट आता शिथिल झाली आहे.

कोरोना काळामुळे EWS प्रमाणपत्र न निघाल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. याबद्दल विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EWS प्रमाणपत्र नसेल तरीही विद्यार्थ्यांना मुलाखतींसाठी संधी देण्याची मुभा आता देण्यात आली आहे.

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयासाठी स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांनी दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका पॅटर्न २०२३ पासून लागू करण्याला विरोध केला होता. हा पेपर पॅटर्न २०२५ पासून लागू व्हावा, अशा मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलनही केलं होतं. अखेर या आंदोलनाला यश आलं आणि विद्यार्थ्यांची ही मागणीही मान्य झाली.

Share This News
error: Content is protected !!