पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का! शर्मिला येवले यांचा युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा

504 0

पुणे : पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शर्मिला येवले यांनी युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा दिला आहे. धक्कादायक म्हणजे शर्मिला येवले यांच्यासह 36 जणांनि राजीनामा दिला आहे.

पुण्यासह इतर जिल्ह्यातील देखील युवासेना पदाधिकारी राजीनामा देणार असलायची माहिती मिळते आहे.

यावेळी शर्मिला येवले म्हणाली कि, पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार राज्यभर दौरे केले. मुंबईतील युवासेना म्हणजे राज्यातील युवासेना नव्हे, वरिष्ठांकडून आम्हाला आमच्या तक्रारी अनेकदा सांगितल्या मात्र वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही. अडचणीच्या काळात पक्षाला सोडून जाणं हे पटतं नाही. पक्ष सोडणार नाही पदाचा राजीनामा देऊन इथंच थांबणार असल्याचा त्यांनी स्पष्ट केलं आहे. पदाचा राजीनामा देऊन वरुण सरदेसाई यांना भेटणार असून आमच्या पक्षातून एकाही वरिष्ठांचा फोन आला नाही हे देखील स्पष्ट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!