MURDER CASE INDAPUR : संतापजनक; वडिलांवरचा राग काढण्यासाठी 4 वर्षाच्या मुलावर घातला ट्रॅक्टर, आणि मग…

425 0

इंदापूर : जमिनीच्या वादातून वडिलांशी असलेल्या वैराचा संताप अनावर होऊन बदला घेण्याच्या द्वेषाने एका नराधमाने चार वर्षाच्या चिमुकल्यावर ट्रॅक्टर घालून त्याची हत्या केल्याचा धक्कादाय प्रकार इंदापूर मध्ये घडला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, इंदापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या सरसेवाडी येथील जब्बार गफूर शेख यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी जयप्रकाश नरहरी देवकाते याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून भांडण होते. याचा राग मनात धरून जयप्रकाश नरहरी देवकाते यांनी चार वर्षाच्या मुलावर ट्रॅक्टर घालून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर तो ट्रॅक्टर शेतात सोडून फरार झाला आहे. या घटनेमध्ये गंभीर दुखापतीमुळे अगोदर जब्बार शेख या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!