अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सीताराम कुंटे त्यांचा इडी समोर जबाब

230 0

मुंबई- राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. देशमुख हे पोलीस आणि विशिष्ट पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा आरोप सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत झाली आहे. अनिल देशमुख सध्या100 कोटी वसुली प्रकरणात तुरुंगात आहेत.
देशमुख यांच्या भ्रष्टाचारांच्या मालिका संपता संपत नाहीत. पोलीस बदल्यांसाठी अनिल देशमुख अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाब म्हटलंय, अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. अनिल देशमुख त्यांच्या माणासांकडून विशेषत: संजीव पलांडे त्यांच्या इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचे, असं कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं असल्याचं कळतंय.

अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्यानं यादीला नाकारत नसल्याचं कुंटे यांनी म्हटल्याचे सूत्रांकडून समजतं.

Share This News
error: Content is protected !!