#SOLAPUR ACCIDENT : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात; एकाचा मृत्यू, आठ जण गंभीर जखमी

1744 0

सोलापूर : येथील मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा फाटा या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या 38 भाविकांच्या ट्रॅव्हल्सला मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 38 भाविकांना घेऊन जाणारी ही ट्रॅव्हल्स बस अपघातानंतर पलटी झाली. या अपघातामध्ये एका भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 29 जण बालबाल बचावले आहेत.

बुधवारी सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. कर्नाटकातील देवदर्शनासाठी ही ट्रॅव्हल्स निघाली होती. ट्रॅव्हल्सचा वेग जास्त होता. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळेच ही बस पलटी झाली असल्याच अपघातग्रस्त भाविकांनी म्हटलं आहे. सध्या जखमींवर सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share This News
error: Content is protected !!