“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ,भगिनींनो आणि मातांनो…!” उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहिलात का ?

377 0

मुंबई : दसरा मेळाव्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टिझर काल लॉन्च केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठीचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा ! हा दसरा मेळावा 5 ऑक्टोबर 2022 रोजी ,सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार असून उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेनेच्या अधिक ृत ट्विटर हँडल वरील टिझर रिट्विट केला आहे.

शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून हा टिझर री ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी कॅप्शन दिले आहे कि, वाजत गाजत गुलाल उधळत या… पण शिस्तीत या…! असं आवाहन केलं आहे.

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या या व्हिडिओमध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांच्या आवाजात हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर शिंदे गटाच्या व्हिडिओमध्ये खुद्द हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आहे.

Share This News
error: Content is protected !!