पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादा संतापले…..म्हणाले, ‘आम्ही घरात असलं करत नाही’

455 0

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवेगळे गौप्यस्फोट करून धक्के दिले जात आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट, त्याला शरद पवार यांनी दिलेले उत्तर यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. असाच एक गौप्यस्फोट शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. त्यावरून प्रश्न विचारताच अजितदादा संतापले.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक झाली होती. यामध्ये रोहित पवार निवडून आले होते. मात्र, आता या निवडणुकीवरून राजकारण पेटण्याचे चिन्ह आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी कोणा-कोणाला फोन केले ते सांगावं? असं नरेश म्हस्के म्हणाले.

आधी स्वतः च्या पक्षामधे एकमत करा की, भावी मुख्यमंत्री उमेदवार कोण आणि मग इतरांवर टीका करा. अजित दादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला जातो. जयंत पाटील यांचा बॅनर लावला गेला , सुप्रिया सुळे यांचा पण लावला गेला नक्की तीन तीन मुख्यमंत्री करणार आहेत का, असा खोचक सवाल नरेश म्हस्के यांनी केला. पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते ? अजित पवार साहेब, आधी आपले घरातले बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, असे म्हस्के म्हणाले.

नरेश म्हस्केंच्या या आरोपांवर पत्रकाराने प्रश्न विचारताच अजितदादांनी दोनवेळा उत्तर देण्याचे टाळले. मात्र नंतर उत्तर देताना म्हणाले, ” कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही,फालतू स्टेटमेंटला महत्त्व देत नाही. रोहित मला मुलासारखा, आम्ही घरात असलं करत नाही” असं ठणकावून सांगितलं.

दरम्यान, दरम्यान, नरेश म्हस्के यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. नरेश म्हस्के तुम्ही मध्यंतरी काय केले हे राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुम्ही शिवसेना पक्षाचे चाळीस आमदार फोडले आणि तुमचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे राज्यातील जनता तुम्हाला गद्दार म्हणत आहे. स्वतःच ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहायचे वाकून हे बंद करा. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करणाऱ्यांना अजित पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, या शब्दांत सचिन खरात यांनी सुनावले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!