अजित पवारांचा कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “अब्दुल सत्तार यांनी 150 कोटी रुपयांची जमीन…!” VIDEO

484 0

नागपूर : सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये रोज सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येताना दिसत आहेत. आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे. दुसरा आठवडा देखील चांगलाच गाजतो आहे. आज सभागृहामध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनामांची मागणी केली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी वाशिम मधील तब्बल दीडशे कोटी रुपयांची जमीन मातीमोल किमतीत एका व्यक्तीला विकली आहे. हा गंभीर आरोप करून अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनामे यांची मागणी केली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!