Breaking News ! २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे विमान बेपत्ता, विमानात ४ भारतीय प्रवासी

349 0

काठमांडू- २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे तारा एअर विमान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या विमानाचा नियंत्रणकक्षाशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

हे विमान जॉमसॉमच्या हवाई हद्दीत मुस्तंग इथं शेवटचं पाहिलं गेलं होतं. त्यानंतर त्याने दिशा बदलली. इथूनच या विमानाचा संपर्क तुटला. या विमानाशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पण संपर्क होऊ न शकल्यामुळे आता स्थानिक यंत्रणेकडून शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक प्रतिनिधींनी दिली आहे. नेपाळ गृहमंत्रालयाकडून दोन खासगी हेलिकॉप्टर तसेच नेपाळच्या सैन्याकडूनही शोध सुरु करण्यात आला आहे.

सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले होते. 9 NAET ट्वीन इंजिन असलेलं हे विमान तारा एअरलाईन्स कंपनीचं होतं. या विमानात एकूण 22 प्रवासी असल्याचं स्पष्ट झालं. यात एकूण चार भारतीय प्रवाशांचा समावेश आहे. तर तीन जपानी प्रवासी असून अन्य 15 प्रवासही नेपाळमधीलच आहेत.

Share This News
error: Content is protected !!