दलितांवर अन्याय झाल्यास आक्रमकपणे लढा द्या – रमेश बागवे

262 0

पुणे- दलित समाजावर विशेष करून मातंग समाजावर अन्याय अत्याचार सातत्याने होत आहेत. दलित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास अतिशय आक्रमकपणे कार्यकर्त्यांनी न्याय मिळण्यासाठी लढा उभारला पाहिजे असे आवाहन माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी केले. पुण्यात आयोजित केलेल्या मातंग समाजाच्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत ते बोलत होते.

निर्धार परिषदेसाठी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय प्र.बा.सोनवणे, यादवराव सोनवणे, अशोकराव कांबळे ,एडवोकेट एकनाथ सुगावकर,मुख्य समन्वयक विठ्ठलराव थोरात, महिला आघाडीच्या ऍड. राजश्री अडसूळ, जिल्हाध्यक्ष अलकाताई सकट, सरचिटणीस सुरेखाताई खंडाळे तसेच महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, ” मातंग समाज हा राज्यातील सर्वात मोठा दोन नंबरचा लोकसंख्या असलेला समाज असून केवळ आपसातील गटामुळे व विस्कळीतपणा मुळे आपल्यावर होणारे अन्याय-अत्याचार मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जर आपण एकजूट नाही झालो तर भविष्यात समाजाला आणखी वाईट दिवस येतील. या करिता आजपासूनच विस्तारासाठी सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या भागांमध्ये काम करणे काळाची गरज आहे”

संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजूट करून या पुढील काळात संघटनेचा विस्तार गावोगावी, खेडोपाडी जाऊन केला गेला पाहिजे. समाजावर वाढते अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी एकसंघ राहणे अत्यंत गरजेचे आहे असे मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले.

उपस्थित जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना नवीन पदाचे वाटप उपस्थित प्रमुख मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते देण्यात आले. चंद्रकांत काळोखे, रामभाऊ वाघमारे ,शिवाजी घुले, अनिल निर्भवणे, अलका सकट , सुरेखा खंडाळे अशा एकूण 25 नविन पदाधिकाऱ्यांना नवीन पदभार देण्यात आला. प्रास्ताविक श्री अरुण गायकवाड यांनी केले तर आभार संजय साठे यांनी मानले.

Share This News

Related Post

बालविवाह करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सफाई कंत्राटदारावर गुन्हा

Posted by - April 30, 2022 0
पुणे- बालविवाह करुन मारहाण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या सफाई कंत्राटदारावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या…

MP Girish Bapat : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करा

Posted by - September 21, 2022 0
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करावा अशा सूचना खासदार बापट यांनी…

मोठी बातमी ! शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या रॅडिसन हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्ला

Posted by - June 23, 2022 0
गुवाहाटी- एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आहे.…
RASHIBHAVISHY

कुंभ राशीसाठी आजचा दिवस मन उल्हासित करणारा; आनंदी घटना घडेल ! वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Posted by - January 11, 2023 0
मेष रास : आज तुम्हाला तुमच्या सवयीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. ही सवय आहे संकटांबाबत सातत्याने चर्चा करणे , आणि…

NET, SET, PHD धारक संघर्ष समितीचे प्राध्यापक भरतीसाठीचे आंदोलन; बुद्धिवंतांची मुस्कटदाबी करू नका; आंदोलनकर्त्यांचा निर्वाणीचा इशारा…

Posted by - October 27, 2022 0
पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद असून त्यामुळे नेट सेट पीएचडी या उच्च पदव्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *