अहमदनगर : बीजमाता राहीबाई पोपेरेंनी साकारला अस्सल गावरान बियांचा बाप्पा… पाहा

612 0

अहमदनगर : देशभर गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या जोशात होत असताना, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या राहत्या घरी अस्सल गावठी बियाण्यांपासून बनवलेल्या गणरायांचं सुंदर प्रतीक साकारलं आहे. मनोभावे पूजा करत या गणरायांची स्थापना केली आहे.

गावठी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ उभी करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी वाल, भात, नागली, वरई, भोपळा, मूग, उडीद, आबई, कारली, दोडका इत्यादी गावठी बियांचा वापर करून गणपतीची प्रतिकृती निर्माण केली आहे.या गणरायांना पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.निसर्गपूरक गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide